वर्ष : २० वे
मशाल गणेशोत्सव स्पर्धा २०२५
गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखावे साकारतात, तसेच घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जाते. सार्वजनिक मंडळांच्या देखाव्यांच्या माध्यमातून आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीद्वारे सामाजिक संदेशदेखील दिले जातात.
या गणेश चतुर्थीला आपल्या घरात आणि सोसायटीत मनमोहक आणि आनंददायी वातावरण निर्माण करूया. गणेशोत्सव साजरा करण्याचा हा आनंदाचा आणि सर्जनशीलतेचा क्षण आहे. यावेळी आपल्या गणपतीच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी सजावट स्पर्धेत सहभागी व्हा आणि आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवा.
➤ आपल्या घर किंवा सोसायटीत गणेशाच्या मंडपाला मनमोहक, पारंपरिक तसेच सर्जनशील सजावट देणे.
➤ सार्वजनिक बांधिलकी वाढवणे आणि सणाची गोडी वाढवणे.
➤ लोकांना पर्यावरणपूरक व नैसर्गिक सजावटीकडे प्रोत्साहित करणे.
➤ घरगुती गणेशोत्सव सजावट
➤ सोसायटी गणेश मंडप सजावट
स्पर्धेचे नियम आणि अटी:
✅ सजावटीसाठी नैसर्गिक व पर्यावरणपूरक साहित्य वापरणे प्राधान्य आहे.
✅ सोसायटीत सजावट करताना नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.
✅ एका घराकडून किंवा सोसायटीकडून एकच प्रवेशिका स्वीकारली जाईल.
✅ स्पर्धे साठी नाव नोंदणी विनामूल्य आहे व ती २७-ऑगस्ट ते ६-सप्टेंबर २०२५ पर्यंत करता येईल.
परीक्षक स्पर्धकांची गुणवत्ता आणि सर्जनशीलता यावर आधारित निष्पक्ष निर्णय करतील.
🏅 घरचा गणपती सजावट: प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक
🏅 सोसायटी गणेशोत्सव सजावट: प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक
📋 सहभागी होणार्यांना प्रमाणपत्रे आणि खास भेटवस्तू
१. दिलेला QR Code स्कॅन करा किंवा 8806333789 या व्हाट्सअप नंबर वर Hi मेसेज करा
२. आपण घरचा गणपती कि सोसायटी गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होत आहात ते निवडा
३. आपले नाव व पत्ता पाठवा
४. यानंतर सजावटी चे फोटो / व्हिडीओ अपलोड करा
५. आपले लोकेशन शेयर करा
६. आपली माहिती अपलोड झाल्यावर एक नोंदणी क्रमांक मिळेल
७. स्पर्धेचा निकाल व इतर माहिती 8806333789 या नंबर द्वारे दिली जाईल
अधिक माहिती साठी:
कृपया दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करा. आम्ही आपल्या प्रश्नांची तत्परतेने उत्तरे देऊ.
या गणेशोत्सवात सजावट स्पर्धेत सहभागी व्हा आणि आपल्या सर्जनशीलतेने सणाला एक नवीन रंग द्या.
आपल्या गणपतीच्या आगमनाला आपल्या सजावटीने सर्वोत्तम बनवूया!




